पंढरपूर : ईगल आय मीडिया
मंगळवार ( दि. १६ ) रोजी पंढरपूर शहरासह ग्रामीण भागात सर्वदूर मान्सूनच्या पावसाने संततधार हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी सुखावला असून मागील १२ वर्षात प्रथमच जून महिन्यात पावसाने वेळेवर हजेरी लावली आहे.
दरवर्षी पंढरपूर तालुक्यात जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून पाऊस सुरु होत असतो. तालुक्यातील शेतकरीसुद्धा त्याच प्रमाणे शेतीचे नियोजन करीत असतो. मागील वर्षी तर सप्टेंबर महिना अखेरीस पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे मागील सुमारे १० वर्षात तालुक्यात खरिपाची पेरणीही झाली नाही. या पार्श्वभूमीवर यंदा मात्र पावसाचे अगदी वेळेवर आगमन झाले आहे. १२ जुलै रोजी तालुक्यात पाऊस सुरु झाला असून दररोज तालुक्याच्या सर्व भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे.
मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून तालुक्याच्या सर्वदूर भागात दिवसभर हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. तालुक्याच्या चौफेर भागात मंगळवारी पाऊस पडलेला आहे. पंढरपूर शहरात मंगळवारी आठवडी आठवडा बाजार असतो , पावसाने बाजारकऱ्यांची दैना उडाली. ग्रामीण भागात खरिपाच्या पेरण्या, शेतीच्या मशागतीची कामे जोमाने सुरु आहेत.चबरोबर यंदा पावसाने वेळेवर उपस्थिती लावल्याने उसाची लागवड वाढणार असल्याचे दिसू लागले आहे. मंगळवारी मात्र पावसामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत. तालुक्यात पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावल्यामुळे पहिल्यांदाच खरिपाची पिके शेतकऱ्यांच्या पदरात पडतील असे चित्र निर्माण झाले आहे. त्या