टीम : ईगल आय मीडिया
गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला मान्सून अखेरीस राज्यात आला असून येत्या दोन दिवसात राज्याच्या बहुतांश भागात तो बारसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा होती. मागील आठवड्यात अरबी सागरात येऊन गेलेल्या चक्री वादळामुळे मान्सूनची वाटचाल कर्नाटकात अडखळली होती. मात्र त्यानंतर मान्सून त्याच्या नियमित गतीने पुढे निघाला असून अपेक्षेपेक्षा केवळ २ दिवस उशिरा तो राज्यात आलेला आहे . आज गुरुवार ( दि. १२ ) गोव्यासह कोकण, मराठवाडा मध्य महाराष्ट्रात त्याचे आगमन झाले आहे. दक्षिण, पूर्वोत्तर भारतात मान्सूनने आगेकूच केली असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार स्वरूपात कोसळेल असेे हवामान खात्याच्या मुंबई विभागाचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे.