पंढरपूर तालुक्यात शेतकऱ्यांना बांधावर बियाणे व खतांचे वाटप

           पंढरपूर : ईगल आय मीडिया

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची खते व  बियाणे खरेदीसाठी दुकानामध्ये गर्दी होऊ नये म्हणून शेतकयांच्या  बांधावर खते व बियाणे पुरविण्याची  मोहिम कृषी विभागामार्फत हाती घेण्यात आली  असून, कृषी विभागामार्फत शेतकरी गट व कृषी कंपन्या व बचत गटांच्या माध्यमातून खते बियाणे वाटप करण्यात येत असल्याची  माहिती उपविभागीय कृषी अधिकारी  आर. एन. कांबळे यांनी दिली आहे.

            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी तसेच शेतीच्या कामात नियोजनाची आवश्यकता असल्याने कृषी विभागाच्या माध्यामातून गट तयार करण्यात आले.  तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना खते व बियाणे पुरविण्याचे नियोजन  कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले  आहे.  तालुक्यात  गटाच्या माध्यमातून आतापर्यंत 298 क्विंटल बियाणे व 1 हजार 75 0 टन खते सुमारे 8 हजार शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले असल्याचे श्री कांबळे यांनी  सांगितले.

                शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी  तसेच गुणवत्तापुर्ण व प्रमाणित बी-बीयाणे, खते शेतक-यांना मिळावे यासाठी कृषी विभाग सज्ज  झाला आहे.  खरीप हंगामात खते, बियाणे उपलब्ध असून शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे मिळावे  तसेच शेतकऱ्यांची संभाव्य फसवणूक रोखण्यासाठी व दर्जेदार तसेच प्रमाणित बियाणे, खते  मिळावे  यासाठी कृषी विभागाकडून आवश्यक  प्रयत्न केले जात असल्याचेही उपविभागीय कृषी अधिकारी कांबळे यांनी यावेळी सांगितले .

               बांधावर खते व बियाणे पुरविण्याची  मोहिमेच्या अनुषंगाने तालुक्यातील पळशी व उंबरगांव  येथे 2 हजार 250 किलो मका बियाणे कृषी विभागाच्या व महिला बचत गटाच्या माध्यमातून वाटप करण्यात आले  आहे. यावेळी कृषी मंडळ अधिकारी श्री.सरडे यांनी  मका या पिकावरील अमेरिकन अळीच्या नुकसानी पासूण  बचाव करण्यासाठी कोणती औषधे वापरावीत याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

error: Content is protected !!