आणि कृषी अधिकारी पोहोचले बोरीच्या बागेत !

‘ ईगल आय मीडिया ‘ च्या वृत्ताची दखल

पंढरपूर : ईगल आय मिडीया

पंढरपूर तालुक्यातील बोहाळी, खर्डी, उंबरगाव परिसरात असलेल्या बोरीच्या बागांवर लाल डंख माशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून या संदर्भात ‘ईगल आय मीडिया’ या वेबसाईटवर वृत्त प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेऊन कृषी अधिकारी तातडीने बोरीच्या शेतात गेले आणि पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य तो सल्लाही दिला.
बोहाळी, खर्डी, उंबरगाव या भागात बोराच्या बागेवर तांबडी डंक माशीने हल्ला करून बोरीचे पीक संपूर्णपणे नष्ट केल्याचे समोर येत आहे. चांगल्या प्रकारातील फवारणी करूनही ही आळी कंट्रोल नसल्याने बागांच्या बागा उध्वस्त होत आहेत. पंढरपूर तालुका कृषी अधिकाऱ्यांना याची माहिती वारंवार देऊन देखील अधिकारी बागेची पाहणी करण्यासाठी येण्यास टाळाटाळ करत आहेत असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

या संदर्भात ‘ ईगल आय मीडिया ‘ वेबसाईटवर वृत्त प्रकाशित होताच राष्ट्रवादी किसान सभा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शुभांगी जाधव यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात जाब विचारला. तसेच शेतकऱ्यांशी सम्पर्क साधून त्यांचा अडचणी जाणून घेतल्या.


त्यानंतर तातडीने अधिकाऱ्यांनी खर्डी येथील शेतकरी भोसले, चव्हाण, रोंगे यांच्या बोरी बागेला भेट दिली. यावेळी संपूर्ण बोरी बागेमध्ये फळाला फळमाशी चा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला आहे. या फळ बागेस तीन ते चार कीटकनाशके व बुरशी नाशके यांची फवारणी केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले मात्र फळमाशी व अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी फळमाशी नियंत्रण विषयक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

error: Content is protected !!