4 लाख 43 हजार टन ऊसाचे गाळप
मंगळवेढा : ईगल आय मीडिया
लवंगी (ता.मंगळवेढा ) येथील भैरवनाथ शुगरच्या ७ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या शुभहस्ते गव्हाण पूजन करून करण्यात आला. चालू गळीत हंगामात भैरवनाथ शुगरने 4 लाख 43 हजार 550 मे.टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. यावेळी वाहन ट्रॅक्टर पूजन जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सुरवातीस सत्यनारायण पुजा श्री.प्रभाकर इंगोले व सौ. इंगोले यांच्या हस्ते करण्यात आली.
भैरवनाथ शुगरचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.डॉ.प्रा.तानाजीराव सावंत,चेअरमन मा.प्रा.शिवाजीराव सावंत व व्हा.चेअरमन मा.अनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 122 दिवसा मध्ये हे गाळप झाले आहे.
सर्व उस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूक कंत्राटदार यांचे सहकार्य व विश्वास तसेच कारखान्यामधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य यामुळे हे गाळप शक्य झाले असून प्रतिकूल अशा परिस्थितिमध्ये ही भैरवनाथ शुगरने ऊसाचे गाळप केले आहे, असे प्रतिपादन व्हा.चेअरमन मा.अनिल सावंत यांनी यावेळी केले.
यावेळी यावेळी जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे, श्रीपती(आप्पा) माने(सरकार), बंडू जाधव, च्ंद्रकांत देवकर, इंद्रजीत पवार, तानाजी चव्हाण, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, जनरल मॅनेजर (प्रोसेस) अनिल पोरे, शेती अधिकारी शिवाजी चव्हाण, ऊस पुरवठा अधिकारी कृष्णदेव लोंढे, एच.आर. मॅनेजर संजय राठोड, ई.डी.पी. मॅनेजर नवनाथ चव्हाण, इलेक्ट्रिक इंजिनीअर राजाराम कोरे, फायनान्स अकाऊंटंट देवानंद पासले, सुरक्षा अधिकारी प्रकाश कमळे, केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील , सिव्हिल इंजिनीअर इर्षाद पाटील, अनिल खंदारे, अभिजीत पवार, स्टोअर किपर दत्तात्रय गाडे, गोडवून किपर प्रमोद भोसले, सुहास जाधव,राहुल जरे तसेच सर्व विभागातील कर्मचारी व शेतकरी ,वाहन मालक उपस्थितीत होते.