आ. प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली दामाजीची निवडणूक लढण्याची समर्थकांची घोषणा
टीम : ईगल आय मीडिया
येत्या काही दिवसांत श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक लागणार असून ही निवडणूक परिचारक गट लढवणार आहे. त्यासंदर्भात नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक झाली असुन आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचे ठरले आहे. परिचारक समर्थक माजी जि प सदस्य शिवानंद पाटील, नियोजन मंंडळाचे माजी सदस्य युनूूूस शेेेख, जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वादडेकर, माजी नगरसेवक अरुण किल्लेदार यांनी दिली.
स्वर्गीय मारवडी वकिल साहेब व स्वर्गीय रतनचंद शहा यांनी राजकीय मतभेद बाजुला ठेवुन तालुक्यातील लोकांना सोसायटी कर्ज काढुन श्री संत दामाजी कारखान्याने भागभांडवल उभा करुन हा कारखाना तालुक्यातील सर्व लोकांना सभासद करुन हा कारखाना शेतकऱ्यांच्या राजवाडा म्हणून उभा केला व चालविला.
संपुर्ण जग कोरोनाच्या महामारीमुळे घरात बसले असताना दामाजी कारखान्याचे विद्यमान संचालाक मंडळाने १९००० सभासदांना अक्रियाशील करण्यासाठी व त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी पोस्टाने नोटीसा पाठवल्या आहेत. तांत्रिकदृष्ट्या बोगस क्रियाशील सभासद करुन त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात संचालक मंडळ यशस्वी ठरले होते.
पण राज्य मंञीमंडळाने कोरोना महामारीमुळे राज्यातील सर्व सहाकारी संस्था मधील सभासद हे मतदानापासुुन वंचित राहु नये यासाठी हा निर्णय घेतला. तालुक्यातील सभासदांनी या सर्व गोष्टीचा विचार करुन तालुक्यातील दामाजी सहकारी साखर कारखाना राहवा, सभासद, , कर्मचारी यांचे हीत डोळ्यासमोर ठेवुन आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण पॕनल लढवण्याचे ठरले आहे.
त्या दृष्टीने लवकरच बैठका घेण्याचे ठरले असून कारखान्याची बांधणी करण्याचे व सर्वसमावेशक पॕनल तयार करण्याची तयारी सुरु आहे अशी मााहिती