दामाजी 6 लाख टन ऊस गाळप करणार

28 वा गाळप हंगाम बॉयलर अग्निप्रदिपन संपन्न

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

दामाजीच्या सभासदांनी आपला संपूर्ण ऊस आपल्याच कारखान्यास घालावा. चालु गळीत हंगामामध्ये कारखाना सहा ते साडे सहा लाख मे.टन ऊस गाळप करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याची ग्वाही दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी दिली.


श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या 28 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांचे शुभहस्ते व व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात पार पडला. सकाळी 9 वाजता सत्यनारायण महापूजा कारखान्याच्या संचालिका सौ.कविता भारत निकम व त्यांचे पती श्री. भारत सौदागर निकम या उभयतांचे शुभहस्ते करण्यांत आली.


अवताडे पुढे म्हणाले की, आपल्या कारखान्याच्या मशिनरीच्या सर्व दुरुस्त्या झालेल्या आहेत. चालु गळीत हंगामात प्र.दिन 4000 मे.टन याप्रमाणे गाळप करु शकतो अशा प्रकारची सर्व यंत्रणा तयार आहे. गतवर्षी आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही दामाजीने 1,62,000 मे.टन गाळप केले. आपल्याकडे साखर सोडून कोणतेही उत्पन्न नसतांनाही फक्त कामगार,सभासद व ऊस उत्पादकांच्या श्रेयामुळेच आपण आर्थिक नियोजन करु शकतो.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थितांचे स्वागत करताना कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांचे नेतृत्व व कुशल मार्गदर्शनाखाली कारखान्याचा गळीत हंगाम सन 2020-21 हा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. ऊस उत्पादकांचे कारखान्यावर असलेले प्रेमामुळे जास्तीत जास्त ऊस उत्पादकांनी ऊस देवून सहकार्य करावे. हंगामाकरिता आवश्यक असणारी ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा पुरेशा प्रमाणात भरती केली असून हंगाम चांगल्या प्रकारे पार पडणार असलेचा त्यांनी विश्वास व्यक्त केला.


या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक लक्ष्मण जगताप,राजीव बाबर, शिवयोग्याप्पा पुजारी, मारुती थोरबोले, रामकृष्ण चव्हाण, बाळासाो शिंदे, सचिन शिवशरण,सौ.स्मिता म्हमाणे यांचेसह माजी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत, पं.स.सदस्य लक्ष्मण मस्के, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, सरोज काझी, बँक स्थायी तपासणीस विलास पाटील, कारखान्याचे वर्क्स मॅनेजर सुहास शिनगारे, शेतकी अधिकारी रमेश पवार, कार्यालय अधिक्षक दगडू फटे, लेबर ऑफिसर – आप्पासाो शिनगारे, स्टोअर किपर उत्तम भुसे, सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे, कामगार संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड, कामगार पतसंस्थेचे चेअरमन विश्वास सावंजीे, शेतकरी, सभासद, इतर अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार संचालक सुरेश भाकरे यांनी मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!