शेतकऱ्यानी कृषी योजनांचा लाभ घ्यावा : तालुका कृषीअधिकारी पवार


पंढरपूर : ईगल आय मीडिया

शेतकऱ्यांसाठी शासन विविध योजना राबवत असते,आशा सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे,असे मत पंढरपूर तालुका कृषी अधिकारी आर.वाय. पवार यांनी मुंढेवाडी (ता.पंढरपूर) येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन प्रसंगी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य उषाबाई नवनाथ बंगाळे या उपस्थित होत्या.


कृषी संजीवनी कार्यक्रमास सरपंच सुजाता भास्कर मोरे,उपसरपंच पारुबाई मोहन घाडगे,ग्रामपंचायत सदस्य सुनिता महादेव मोरे,स्वाती धर्मा नवले,पोलीस पाटील राणी शरद मोरे,माजी सरपंच सिद्धेश्वर मोरे,सोसायटी सचिव सुदाम मोरे,प्रगतशील शेतकरी रामचंद्र मोरे,पुंडलिक मोरे,अनिल शिंदे,कृषी मित्र गणेश मोरे, व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.


पंढरपूर अंतर्गत मुंढेवाडी,गोपाळपूर,कोंढारकी,पंढरपूर या ठिकाणी कृषी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडल कृषी अधिकारी जे.के.खरात मॅडम व भोसले यांनी दिली. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या फळबाग लागवड,फळपीक विमा योजना,शेतकरी अपघात योजना,तसेच शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर असणाऱ्या योजनांची माहिती कृषी पर्यवेक्षक जी.के.घाडगे,कृषी सहाय्यक एस.आर.गवळी मॅडम यांनी या वेळी दिली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक एस.आर.गवळी(अभंगराव) यांनी केले तर आभार सोसायटीचे सचिव सुदाम मोरे यांनी मानले.
कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त माहिती मिळत असून या योजनेचा लाभ सर्वानी घ्यावा व असे कार्यक्रम राबावल्याबद्द ग्रामस्थांनी कृषी विभागाचे आभार मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!