10 व्या गाळप हंगामाचा शुभारंभ : सर्वाधिक दर देण्याची ग्वाही
मोहोळ : ईगल आय मीडिया
वटवटे (ता.मोहोळ) येथील जकराया साखर कारखाना सालाबाद प्रमाणे यंदाच्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला जिल्ह्यातील इतर कारखाण्यापेक्षा जास्त दर देणार असल्याची ग्वाही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बी.डी.जाधव यांनी दिली.
कारखान्याचा 10 वा बॉयलर अग्नी प्रदीपन व गाळप हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे पार पडला. कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, संचालक राहुल जाधव, संचालिका सौ. उमादेवी जाधव, जकराया मल्टिस्टेटच्या मुख्याधिकारी सौ. मनीषा जाधव, सौ.प्रियांका जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. सत्यनारायण महापूजा वटवटेच्या सरपंच पद्मिनी काळे आणि येणकीचे ग्रामसेवक विरुदेव काळे या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी बोलताना अॅड. जाधव म्हणाले की, जकराया कारखान्याने गेल्या वर्षी ऊस दराबाबत दिलेला शब्द पाळला असून कारखान्याच्या एफ.आर.पी.ची रक्कम २३१० शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. चालू गळीत हंगामातही जास्त दर देण्याची परंपरा कायम राखून शेतकऱ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी कारखाना व्यवस्थापन वचनबद्ध आहे.
यावेळी बोलताना कार्यकारी संचालक सचिन जाधव म्हणाले की, चालू गळीत हंगामात 7 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपाला यावा यासाठी सक्षम ऊस तोडणी यंत्रणा उभारण्यात आली आहे.
200 ट्रॅक्टर, 500 बैलगाडी, 200 डम्पिंग तसेच 10 तोडणी मशीन यंत्र यांचे करार करण्यात आले आहेत. कारखान्याच्या उपपदार्थ निर्मितीच्या प्रकल्पाचीही इतर कामे प्रगतीपथावर आहेत.
शेतकऱ्यांनी आता को २६५ या उसाची लागण करणे थांबवायला हवे. उसाच्या या वानाला चागला उतारा नसल्याने त्याचा फटका कारखान्याला आणि पर्यायाने शेतकऱ्यांना बसतो. कारखान्याने २०२२-२३ सालाच्या गळीत हंगामापासून २६५ जातीच्या उसाचे गाळप न करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी जकराया देवस्थानचे पुजारी ब्रम्हदेव पुजारी, लक्ष्मण माने, प्रभाकर पाटील, विश्वंभर जाधव, भानुदास गावडे, विठोबा जगदाळे, नागराज पाटील, रफिक पाटील, माऊली जाधव, प्रमोद जाधव, म्हाळाप्पा पाटील, सागर जाधव, पाराप्पा पुजारी, महिबूब पटेल, किरण सरवळे, केशव सरवळे, मुख्य शेती अधिकारी नानासाहेब बाबर, केन मॅनेजर विजय महाजन, चीफ केमिस्ट डी.एन. आवताडे, डिस्टिलरी मॅनेजर के.सी. कोटकर, प्रशासन अधिकारी जकराया वाघमारे तसेच उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय महाजन यांनी केले. तर जकराया वाघमारे यांनी आभार मानले.