१९६२ रुपये हमी भाव : नाव नोंदणी सुरु झाली
प्रतिनिधी : पंढरपूर
शासकीय हमी भावानुसार मका खरेदी केंद्र सुरु होणार असून शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी सात बारा उताऱ्यासह नाव नोंदणी करावी असे आवाहन पंढरपूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शांतीनाथ बागल यांनी केले आहे.
शासनाचा हमी भाव प्रति क्विंटल १ हजार ९६२ रुपये इतका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमी भाव खरेदीचा लाभघ्यावा असेही आवाहन बागल यांनी केले आहे.शासकिय हामीभाव खरेदी योजने अंतर्गत भरडद्यान्य खरेदी योजनेत हामी भाव मका खरेदीसाठी शासनाकडून नाव नोंदणीचे आवाहन केले आहे.
पंढरपूर तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने मका हमीभाव खरेदी केंद्र सुरु होणार आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांनी मका पिकांची नोंद असणारा 7112 उतारा, अधारकार्ड व बँक पासबुक झेरॉक्स आदी पंढरपूर तालुका सह- खरेदी विक्री संघ, नवी पेठ, पंढरपूर येथे स्वत: हजर राहून सादर करावे, शासनाचा मका हमी भाव प्रती क्विंटल 1 हजार 962 रु इतका राहिल, असेही बगल यांनी सांगितले आहे.