विषमुक्त खरबूज दुबईला निर्यात : किलोस 45 रु भाव मिळाला


कृषिभूषण अंकुश पडवळे यांचे विषमुक्त खरबुज शरद पवारांच्या घरी

पंढरपूर : ईगल आय मीडिया
खुपसंगी ( ता. मंगळवेढा ) येथील प्रयोगशील शेतकरी
कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी आपल्या शेतात पिकवलेल्या खरबुजाची दुबईला निर्यात केली आहे. 70 रुपये प्रतिकिलो दर निश्चित झाला होता मात्र लॉक डाऊन मुळे दर 45 रुपयांवर आल्याने पडवळे याना नुकसान झाले आहे.
दरम्यान, शेडनेट हाऊस मध्ये उत्पादित केलेले विषमुक्त खरबुज माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांना पाठवले असून त्यांना ते विशेष आवडले.
पाणी, अँटीअॉक्सिडंट,जीवनसत्त्व क्षारयुक्त असनारे खरबुज हे सदृढ आरोग्यायासाठी व शरिराची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उन्हाळ्यातील चविस्ट, गोड फळ आहे. खा. शरद पवार यांना खरबुज अतिशय आवडते. तसेच पवार हे विषमुक्त व सेंद्रिय फळे व भाज्यांना प्राधान्य देतात. कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्या शेतातून डाळिंब व भाजीपाला ही शरद पवार खास नेहमी मागवून घेतात.कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी नाविण्यपूर्ण पणे शेडनेट हाऊस मध्ये मधुमती या खरबुजाचे प्रथमच उत्पादन घेतले आहे. खरबुज हे अतिशय चविस्ट व गोड असल्याने पवार यांना विशेष आवडले असून परत त्यांच्या कडून मागविल्याचे पडवळे यांनी सांगितले.

कोट- “शेती बद्दल विशेष जाण असनारे नेतृत्व म्हणून खा.शरद पवार यांना देश ओळखतो. आशा शेतकरी नेत्याने आमच्या शेतातील खरबुज व इतर विषमुक्त पिकविलेला शेतीमाल खाणे आमच्या दृष्टीने अभिमानाचे आहे. त्यांना खरबुजाची विशेष चव आवडल्याने परत मी मा.पवार साहेबांना विषमुक्त खरबुज, पपई व भाजीपाला पाठवित आहे.
– कृषिभूषण अंकुश पडवळे

कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्या शेडनेट हाऊस मधिल खरबुज दाखविताना माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार

तसेच आपल्या शेतातील खरबुजासह अंकुश पडवळे

Leave a Reply

error: Content is protected !!