शनिवारी शरद पवार सोलापूर जिल्ह्यात

राज्यातील मंत्री, खासदार आणि 9 आमदारांचीही उपस्थिती

सोलापूर : ईगल आय मीडिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे शनिवार ( दि.13 फेब्रुवारी ) रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यांवर येत आहेत. नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील कृषिभूषण नानासाहेब काळे यांनी विकसित केलेल्या ‘किंगबेरी’ या नव्या वाणाच्या द्राक्षे लोकार्पण सोहळा शरद पवारांच्या उपस्थितीत होत आहे.


दरम्यान, शरद पवार हे हेलिकॉफ्टरने नान्नज येथे आगमन होणार आहे.त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित राहून परत ते बारामतीकडे रवाना होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


या कार्यक्रमाला या कार्यक्रमास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी मंत्री दादा भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, यांच्यासह सोलापूरचे खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, आ.बबनदादा शिंदे, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ.प्रणिती शिंदे, आ.यशवंत माने, आ. संजयमामा शिंदे, आ.प्रशांत परिचारक, आ. अनिल बाबर, आ. रोहित पवार, उपस्थित राहणार आहेेेत.

One thought on “शनिवारी शरद पवार सोलापूर जिल्ह्यात

Leave a Reply

error: Content is protected !!