सेंद्रिय शेतीबाबत लवकरच कृषी व पणन मंत्र्यांसोबत बैठक

खा. शरद पवार यांचे मोर्फ़ा च्या पथकास आश्वासन

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

राज्यातील सेंद्रिय व विषमुक्त शेतीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री, सहकार व पणन मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांचे बरोबर कोरोना परिस्थिती नंतर लवकरच खा. शरदचंद्राजी पवार बैठक घेणार असल्याचे महा अॉरगॕनिक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन(मोर्फा) चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे व सचिव प्रल्हाद वरे यांनी पत्रकारांना दिली.
शनिवार (दि,2) रोजी बारामती येथे गोविंदबागेत खा.शरदचंद्राजी पवार यांनी सेंद्रिय व विषमुक्त शेती बाबत बैठक आयोजित केली होती त्यावेळी खा.पवार यांनी वरिल निर्णय घेतल्याचे पडवळे व वरे यांनी सांगितले. यावेळी आमदार सतिश चव्हाण, मा.आ. अमरसिंह पंडित उपस्थित होते. बैठकीस सदाशिव बापू तावरे, मोर्फा चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, सचिव प्रल्हाद वरे, संचालक अमरजित जगताप, विजय तावरे, रोहित अहिवळे उपस्थित होते.

राज्यात सेंद्रिय व विषमुक्त शेतीला मोठा वाव असून त्यादृष्टीने राज्य सरकारचे धोरण बनावे व सेंद्रिय विषमुक्त शेती मालाला किफायतशीर मार्केट मिळावे याबाबत राज्य सरकारने पुढाकार घ्यावा याबाबतचे सविस्तर सादरीकरण बैठकीत मोर्फा चे अध्यक्ष अंकुश पडवळे यांनी केले. सेंद्रिय व विषमुक्त उत्पादनांच्या मार्केटिंग साठी कृषी, पणन व सहकार विभागाची महत्त्वाची भुमिका असून सेंद्रिय व विषमुक्त शेतीच्या विकासात तिन्हीही विभागाची मदत घेऊन सेंद्रिय शेतीचे नविन धोरण बनविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. मोर्फाचे सचिव प्रल्हाद वरे यांनी निर्यातक्षम भाजीपाला व फळांचे क्लस्टर राज्य सरकारने बनवून शेतकरी कंपन्यांना लवकर मदत मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले. पवार यांनी कोरोनाच्या परिस्थितीत नंतर लवकरच कृषी, सहकार व पणन विभागाचे मंत्री व अधिकारी यांची बैठक घेऊन सेंद्रिय व विषमुक्त शेतीच्या अडचणी सोडविल्या जातील असे खा,पवार यांनी सांगितल्याचे पडवळे यांनी सांगितले.

” सेंद्रिय व विषमुक्त तांत्रिक दृष्टीने परिपूर्ण शेती अनेक शेतकरी राज्यात करित आहेत. पण त्यांना त्याचे मार्केटिंग जमत नाही. ग्राहकांमध्ये आशा उत्पादना बाबत विश्वास निर्माण करण्यासाठी शेतकरी व ग्राहक यांच्यात दुआ साधण्याचे काम राज्य सरकारने करावी अशी मागणी आम्ही खा. शरद पवार यांच्या कडे केली”
– कृषिभूषण अंकुश पडवळे
अध्यक्ष महा ओरगॕनिक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन,

Leave a Reply

error: Content is protected !!