तांबड्या डंख माशीने बोर बागा केल्या उध्वस्त

पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नवीन संकट

पंढरपूर : ईगल आय मिडीया
तांबडी डंक माशीने सर्व बोरीच्या बागांमध्ये डंक मारून वर्षातून एकदा येणारे बोरीचे पीक संपूर्णपणे नष्ट केल्याचे समोर येत आहे.
पंढरपूर तालुक्यातील खर्डी, बोहाळी, उंबरगाव भागातील शेतकरी या आळी मुळे त्रस्त झाले आहेत. चांगल्या प्रकारातील फवारणी करूनही ही आळी कंट्रोल नसल्याने बागांच्या बागा उध्वस्त होत आहेत. पंढरपूर तालुका कृषी अधिकाऱ्यांना याची माहिती वारंवार देऊन देखील अधिकारी बागेची पाहणी करण्यासाठी येण्यास टाळाटाळ करत आहेत असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. वर्षातून एकदा येणारे हे पीक पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. सगळीकडे या डंक माशी ने धुमाकूळ घातला आहे.
आजपर्यंत कधीही बोरीच्या बागेला इतक्या प्रमाणात कीड लागली नव्हती, पण यावर्षी बागा पूर्णपणे उध्वस्त केल्या आहेत अशी माहिती शेतकरी सचिन ताठे यांनी दिली. औषधांच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. खते लिंकीग पद्धतीने विकली जातात त्याचाही त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!