पांडुरंग च्या कामगारांची ” दिवाळी ” : 15 टक्के बोनस जाहीर

पांडुरंगच्या गाळप हंगामाचा शुभारंभ !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

श्रीपूर ( ता. माळशिरस ) येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा आज बुधवारी ( दि.14 ऑक्टोबर ) रोजी गाळप हंगाम शुभारंभ करण्यात आला. यावेळी सुद्धा जेष्ठ ऊस उत्पादक सभासदांच्या हस्ते मोळी पूजन करण्यात येत आले. दरम्यान, पांडुरंग च्या कामगारांना दिवाळी सणासाठी 15 टक्के बोनस देण्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आ. प्रशांत परिचारक यांनी केली. पांडुरंग परिवाराचे प्रमुख माजी. आ.कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या 15 सहकाऱ्यांच्या हस्ते गाळप हंगाम सुरू गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला.

यावेळी बाळशास्त्री हरिदास, बाळासाहेब बडवे, लक्ष्मीनारायण भट्टड, आनंदराव क्षिरसागर, परमेश्वर मस्के, घनश्याम काटकर, मारुती देशमुख, सीताराम नागणे,वसंत पाटील, हरी खांडेकर, बाळासाहेब गाजरे ( शेळवे ) मल्हारी वाघमारे, भिमाशंकर भिंगे, बळवंत व्हरगर, आणि वसंतराव बंडगर यांच्या हस्ते मोळी पूजन आणि गव्हाणीत मोळी टाकून हंगाम सुरू करण्यात आला.

यावेळी पांडुरंगचे माजी चेअरमन दिनकर मोरे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा संपन्न झाली. च्या कर्मचाऱ्यांना 15 टक्के दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. उपस्थित जेष्ठ सभासदांचा सत्कार चेअरमन आम. प्रशांत परिचारक, व्हा. चेअरमन वसंत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यकारी संचालक यशवन्त कुलकर्णी, युवा नेते प्रणव परिचारक, सर्व संचालक, अधिकारी, श्रीपुर, बोरगाव,महलुंग परिसरातील विविध संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!