पंढरपूर : ईगल आय मीडिया
जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी आ. प्रशांत परिचारक यांची निवड होण्याची शक्यता आहे. दि.24 रोजी चेअरमन पदाची निवड होत आहे.
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांचे मागील महिन्यात निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या चेअरमन पदाची निवड उद्या होत असून या पदी आ प्रशांत परिचारक यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. या संदर्भात गेल्या चार दिवसांपासून पांडुरंग परिवारातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आ. परिचारक यांना भेटून त्यांनीच चेअरमन व्हावे अशी ईच्छा व्यक्त केली आहे.
मागील 5 वर्षाहून अधिक काळ जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक हे कारखान्याचे चेअरमन तर वसंतराव देशमुख हे व्हा. चेसरमन आहेत. पंतांच्या पश्चात आ.प्रशांत परिचारक यांची बिनविरोध,एकमताने निवड होईल असे बोलले जात आहे. आ. प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने आगामी गाळप हंगामाचे नियोजन सूरु केले असून यंदाच्या हंगामात 12 ते 13 लाख टन ऊस गाळप होईल असे नियोजन केले आहे.
सुधाकरपंत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग कारखान्याने राज्य भरात आपला लौकिक निर्माण केला असुन हा लौकिक अबाधित राखण्यासाठी आ. परिचारक यांच्या खांद्यावरच चेअरमन पदाची धुरा जाण्याची शक्यता आहे. पांडुरंग परिवाराचे या निवडीकडे लक्ष लागले आहे.