पंतकृपा सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी गुलाबराव पोरे

तर  व्हाईस चेअरमनपदी हनुमंत पोरे यांची निवड

पंढरपूर : eagle eye news
वाखरी ( ता. पंढरपूर)  येथील पंतकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी गुलाबराव पोरे यांची तर व्हाईस  चेअरमनपदी हनुमंत पोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  या निवडीनंतर ग्रामस्थांच्यावतीने नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा  सत्कार करण्यात आला.

हे आहेत नूतन संचालक
गुलाब पोरे, हणमंत पोरे, संजय  पोरे, पांडुरंग  ढाळे, ओंकार पोरे, नवनाथ  गोरे, सौ संगीता  पोरे, मनीषा  पोरे, संजय लेंगरे, महेश पोतदार, धोंडिबा मस्के, 

संस्थेचे संस्थापक चेअरमन गुलाबराव पोरे यांच्या नेतृत्वाखाली  पंतकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची निवडणूक स्थापनेपासून  बिनविरोध होत आहे.  संस्थेच्या २०२३-२८ या काळासाठी  संस्थेच्या  संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली.  या निवडणुकीनंतर चेअरमनपदी गुलाबराव पोरे आणि व्हाईस चेअरमनपदी हनुमंत पाटलू  पोरे  यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  या निमित्त  वाखरी ग्रामस्थांच्यावतीने पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 


 यावेळी सरपंच धनश्री साळुंखे, उपसरपंच सोमनाथ पोरे, माजी सरपंच सौ. कविता पोरे, माजी उपसरपंच संग्राम गायकवाड सहकार शिरोमणीचे संचालक इब्राहिम मुजावर, माजी उपसरपंच ज्योतीराम पोरे,  ग्रामविकास अधिकारी सावता शिंदे, आभिमान साळुंखे,  ग्रामपंचायत सदस्य संजय लेंगरे, धनाजी पिसे, गजानन जगताप, विक्रम घोडके, यांच्यासह संतोष पोरे संस्थेचे व्यवस्थापक  सुनील तवटे, दादासाहेब धनवडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!