कामगारांना मिळाला बॉयलर प्रदीपन करण्याचा सन्मान


सहकार शिरोमणीचे बॉयलर अग्निप्रदिपन गव्हान व मोळी पुजन

पंढरपूर : ईगल आय मीडिया

साखर कारखाना यशस्वी चालवण्यात आणि भरभराटीस नेण्यास जे कामगार घाम गाळतात त्याच कामगारांना कारखान्याच्या बॉयलर प्रदीपनाची संधी देऊन समस्त कामगारांचा सन्मान करण्याचा प्रयत्न सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर करखान्याच्या संचालक मंडळाने दिला. त्यामुळे कामगार वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

भाळवणी ( ता.पंढरपूर ) येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 21 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन करण्याचा सन्मान कारखान्यातील विविध विभागातील कामगारांना देण्यात आला.

यामध्ये विष्णु नामदेव पोरे, रघुनाथ झांबरे, दामोदर दुपडे, संभाजी नाईकनवरे या जेष्ठ कर्मचारी यांचे शुभहस्ते बॉयलर प्रदीपन करण्यात आला. आणि गव्हाण, मोळी पुजन समारंभ कारखान्याचे जेष्ठ सभासद भगवान बुरांडे, ज्ञानेश्वर शेंबडे, नवनाथ माने, नारायण गायकवाड, महादेव कानगुडे, संजय गाजरे, रमेश नागणे यांच्या हस्ते संपन्न झाला.

तत्पुर्वी शेती विभागातील ओव्हरसिअर प्रकाश कृष्णा शिंगटे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.नागरताई शिंगटे या उभयतांच्या शुभहस्ते होमहवन आणि जेष्ठ सभासद संजय गाजरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.निलावती गाजरे या उभयतांच्या हस्ते काटा पुजन करण्यात आले. ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार परमेश्वर लामकाने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी यशवंत पतसंस्थेचे चेअरमन नारायण मोरे, व्हा.चेअरमन शहाजी साळूंखे, विष्णु यलमर, महादेव देठे, श्री विट्ठल कारखान्याचे संचालक उत्तम नाईकनवरे, सिताराम महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणेश ठिगळे, निशिगंधा बँकेचे व्हा.चेअरमन आर.बी.जाधव, व्यवस्थापक कैलास शिर्के, जनकल्याण हॉस्पिटलचे डॉ.सुधीर शिनगारे,श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे, सुरेश देठे जयसिंह देशमुख, मोहन उपासे,श्रीमंत लिंगडे,हणमंत मोरे,दिलीप भानवसे,अनिल नागटिळक,नारायण शिंदे, सुनिल पाटील,डॉ.महारनवर,महादेव सुरवसे,दाऊद शेख,रामचंद्र कौलगे, विविध संस्थांचे पदाधिकारी शिक्षक तसेच कारखान्याचे व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे, मारुती भोसले, संचालक गोरख जाधव, बाळासाहेब कौलगे, भारत कोळेकर, आण्णा शिंदे, दिनकर कदम, दिनकर चव्हाण,तानाजी सरदार, विलास जगदाळे, सुधाकर कवडे, राजाराम पाटील, युवराज दगडे, योगेश ताड, इब्राहिम मुजावर, अरुण बागल, उद्योजक नागेश फाटे, एम.एस.सी बँकेचे अधिकारी एस.जी.गावंडे कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.वाय.महिंद सर्व खाते प्रमुख उपखाते प्रमुख मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन समाधान काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संचालक दिनकर चव्हाण यांनी मानले.  

Leave a Reply

error: Content is protected !!