‘विठ्ठल’वर आर.आर.सी.ची कारवाईची नामुष्की

शेतकऱ्यांच्या बिलासाठी जिल्ह्यातील 7 साखर कारखान्यांवर आर आर सी नुसार कारवाईचे साखर आयुक्तांचे आदेश.

पंढरपूर : ईगल आय मीडिया

एकेकाळी जिल्ह्यातील सर्वाधिक दर देणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आता ऊस बिल देण्यासाठी आर आर सी कारवाईची नामुष्की ओढवली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 7 साखर कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेऊन ऊस बिले देण्यासाठी तहसीलदार कारवाई करणार आहेत.

राज्यातील 13 साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले थकवली आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील श्री विठ्ठल सहकारी, लोकमंगल बिबी दारफळ , लोकमंगल भंडारकवठे, गोकूळ धोत्री, अक्कलकोट, विठ्ठल रिफायनरी माढा, सिध्दनाथ तिर्हे आणि जयहिंद अक्कलकोट या साखर कारखान्याचा समावेश आहे.

यंदाच्या हंगामात विठ्ठल सहकारी ने 39 कोटी 76 लाख रुपये थकवले आहेत. ते पैसे देण्यासाठी साखर आयुक्तांनी आर आर सी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता तहसीलदार विठ्ठल सहकारी ची मालमत्ता ताब्यात घेऊन तिची विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे वसूल करणार आहे.

यापूर्वी विठ्ठल ने gst चे 15 कोटी रुपये थकवले आहेत म्हणून बँक खाती सील झालेली असतानाच आता आर आर सी ची कारवाई झाल्याने विठ्ठलवर नामुष्की ओढवली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!