25 तारखेला 10.10 च्या मुहूर्तावर ‘विठ्ठल’ चा गाळप शुभारंभ

1 वर्षाच्या खंडानंतर वाजणार समृद्धीचा गजर !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

1 वर्षाच्या खंडानंतर तालुक्याच्या सर्वांगीण उन्नतीचा स्रोत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाला सुरुवात होत आहे. येत्या रविवारी दसऱ्याच्या दिवशी, 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांच्या राष्ट्रवादी राष्ट्रवादी मुहूर्तावर ह.भ.प. भागवत महाराज चवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गाळप हंगामाचा शुभारंभ होत आहे. विशेष म्हणजे जेष्ठ आणि तरुण मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून शुभारंभ होत आहे.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणींवर कारखान्याचे चेअरमन आम. भारत भालके यांनी शिताफीने मात करीत यंदा गाळप हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार केल्याचे दिसून येते. त्यांच्यावर सभासद, शेतकरी, कामगारांच्या असलेल्या विश्वासाला त्यांनी तडा जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतल्याचे दिसून येते. 2018 -19 या गाळप हंगामातील थकीत एफ आर पी ची 177 रुपये प्रति टन रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग केली आहे. त्यानंतर आता प्रत्यक्ष गाळप हंगाम सुरू केला जात आहे.

येत्या रविवारी विजया दशमीच्या मुहूर्तावर 25 ऑक्टोबर रोजी गाळप हंगाम सुरू होत आहे. त्यासाठी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांचा मुहूर्त काढला असून जेष्ठ नेते,माजी नगराध्यक्ष प्रभाकर उर्फ बाबा अधटराव, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे आणि शिवसेनेचे नेते संजय कोकाटे तसेच 21 जेष्ठ सभासद यांच्या हस्ते मोळी टाकून हंगाम सुरू होत आहे.

या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन आ. भारत भालके, व्हा. लक्ष्मण पवार आणि कार्यकारी संचालक आर. एस. बोरावके यांनी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!