सीताराम शुगर्स : ऊस उत्पादकांची 95 टक्के रक्कम दिली

फक्त दीड कोटी टक्कम बाकी : लवकरच तीही दिली जाणार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

तालुक्यातील सीताराम साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या 23 कोटी रुपयांपैकी 22 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत. आता frp पैकी केवळ दीड कोटी रुपये थकीत रक्कम असून तीसुद्धा लवकरच देण्यात येईल अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. 2018 – 19 या गाळप हंगामातील ऊस बिलाची रक्कम उशिरा का असेना मिळाली असल्याने शेतकऱ्यांतुन समाधान व्यक्त होत आहे.

सीताराम साखर कारखान्याकडे ऊस उत्पादकांची एफ. आर. पी. ची रक्कम थकीत होती. ती रक्कम मिळावी म्हणून शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी अनेकवेळा आंदोलने केली, तो त्यांचा अधिकार होता. मात्र प्रशासनावर विश्वास ठेवून सर्वांनी चांगले सहकार्य केले. साखर कारखाना प्रशासनाने सुद्धा या संदर्भात प्रामाणिकपणे सहकार्य केले त्यामुळे सुमारे 22 कोटी रुपयांची थकीत रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यश आले आहे. आता सुमारे दीड एक कोटी रुपये थकीत आहेत, ते ही लवकरच शेतकऱ्यांना मिळतील यासाठी प्रयत्न करीत आहोत :- सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर

खर्डी ( ता.पंढरपूर ) येथील सीताराम शुगर्स या खाजगी साखर कारखान्यास 2018-19 या गाळप हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची 2231 रुपयांनुसार 23.50 कोटींहून अधिक रक्कम थकीत होती. ही रक्कम मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी मोठा संघर्ष केला होता. रस्त्यावरील आंदोलनासह न्यायालयात ही धाव घेऊन आवाज उठवला होत. कारखाना प्रशासन आणि महसूल प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

शेवटी प्रशासनाने कारखान्याची उत्पादित साखर ताब्यात घेऊन तिची विक्री करून रक्कम उभा केली. मात्र गेल्या काही महिन्यात साखरेचा भाव शासकीय हमी भावाच्या तुलनेत कमी झाल्याने व्यापारी साखर खरेदी करण्यास पुढे आले नाहीत. मात्र साखरेचे दर वाढल्यानंतर प्रशासनाने साखर विक्री करून पहिल्या टप्प्यात 2 हजार रुपये प्रति टन याप्रमाणे टक्कम शेतकऱ्यांना दिली असून दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे.

एफ आर पी ची उर्वरित 231रुपयांनुसार सुमारे दीड कोटी रुपयांची रक्कम लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येईल असेही ढोले यांनी सांगितले. दरम्यान, या संदर्भात संबंधित शेयकऱ्यांशी संपर्क साधला असता 2000 रुपये प्रमाणे रक्कम मिळाली असल्याचे बहुतांश जणांनी सांगितले. तसेच उर्वरित 231 रुपये लवकरच मिळतील अशी अपेक्षा असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!