सहकार शिरोमणीची साखर विकून व्याजासह एफ आर पी द्या

साखर आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

पंढरपूर : ईगल आय मीडिया

तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस पुरवठा दारांची थकीत रक्कम 15 टक्के व्याजासह देण्यात यावी. त्यासाठी कारखान्याची साखर आणि मोलेसीस, बग्यास विक्री करावी असे आदेश साखर आयुक्तांनी काढले आहेत. त्यामुळे एफ आर पी ची रक्कम मिळण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 2010 – 20 च्या हंगामात गाळप झालेल्या उस बिलापोटी एकूण एफ आर पी रक्कम 19 कोटी 69 लाख रुपये थकीत आहे. या संदर्भात सहकार शिरोमणीचे माजी संचालक ऍड. दीपक पवार यांनी साखर आयुक्तांकडे नुकतीच लेखी तक्रार केली होती.

त्यानंतर 23 जून रोजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांना 15 टक्के व्याजासह थकीत एफ आर पी देण्यात यावी असे आदेश दिले आहेत. त्यासाठी कारखान्याने निर्माण केलेली साखर विकण्यात यावी, तसेच रक्कम कमी पडल्यास बग्यास, मोलेसीस चीही विक्री करावी.

तसेच आवश्यकते प्रमाणे कारखान्याच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेवर शासनाचे नाव नोंद करावे असेही आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. साखर आयुक्तांच्या या आदेशामुळे गेल्या 6 ते 8 महिन्यापासून ऊस गाळपास गेलेल्या शेतकऱ्यांच्या एफ आर पी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!