60 लाख टन साखर निर्यात करणार

केंद्रीय मंत्रिमंडळाची घोषणा : 5 कोटी ऊस उत्पादकांना होणार लाभ

टीम : ईगल आय मीडिया

केंद्रीय मंत्रिमंडळाने ६० लाख टन साखर निर्यात  करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून मिळणारे उत्पन्न, त्याचे अनुदान थेट ५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सरकारने ६० लाख टन साखर निर्यातीवर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. यासाठी ३५०० कोटी खर्च येईल. याशिवाय १८००० कोटी रुपयांचे उत्पन्नही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, असं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं.

साखर निर्यातीने देशातील ५ कोटी शेतकर्‍यांना आणि ५ लाख मजुरांना फायदा होईल. आठवड्याभरात शेतकऱ्यांना ५००० कोटी रुपयांचे अनुदान मिळेल. ६० लाख टन साखर ही ६ हजार रुपये प्रति टन दराने निर्यात केली जाईल, असं मंत्र्यांनी सांगितलं.

यंदा साखर उत्पादन ३१० लाख टन होण्याची अपेक्षा आहे. तर देशातील साखरेचा खप हा २६० लाख टन इतका आहे. साखरेचे दर कमी असल्याने शेतकरी आणि साखर कारखाने अडचणीत आले आहेत. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी ६० लाख टन साखर निर्यात करून या निर्यातीवर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!