पंढरपूर : ईगल आय मीडिया
भंडीशेगाव ( ता.पंढरपूर ) येथील तेजस पाईप कंपनी मध्ये कोरोना या आजारावर प्रतिबंधक उपाय म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले. पुणे येथील माजी पोलीस उपअधीक्षक गणपतराव माडगूळकर यांच्या हस्ते या गोळ्या वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. श्रीधर येलमार हे उपस्थित होते.
संपूर्ण जग कोरोनामुळे लॉक डाऊन आहे. परंतु शेतीशी निगडित असलेले पूरक व्यवसाय मात्र शासनाने सुरू ठेवले आहेत, अशा परिस्थितीत कर्मचारी मात्र सर्व प्रकारची काळजी घेऊन नियमित कामावर उपस्थित राहतात. अशा कर्मचारी वर्गाची जबाबदारी म्हणून त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी होमिओपथीची गुणकारी असणारी ही औषधे सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे माडगूळकर यांनी यावेळी सांगितले.
भंडीशेगाव येथे तेजस ऍग्रो या नावाने शेतीसाठी लागणारी पाईप, ठिबक सिंचन प्रकल्पासाठी लागणारी लॅटरल, त्याचप्रमाणें शेतीशी निगडित सर्व प्रकारच्या इरिगेशन मटेरियल या तेजस ऍग्रो कंपनीमध्ये तयार होते आहेत. तेजस ऍग्रो ही दर्जेदार पाईपची निर्मिती करणारी राज्यातील आघाडीची कंपनी असून कंपनी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पाईप ची विक्री करणारी कंपनी आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेऊन आपल्या कुटुंबाची देखील काळजी घेतली पाहिजे, असे डॉ. श्रीधर येलमार यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास कंपनीचे डायरेक्टर शिवाजी अजळकर, निशांत माडगूळकर, मॅनेजर प्रवीण शिवसरण, रविंद्र भुई,दत्तात्रय व्हॅलेकर,अभिजित वाघ,अतुल देशमुख, संतोष मस्के,सर्व कर्मचारी उउपस्थित होते.