युटोपीयनचा दिवाळी हप्ता 200 रुपये

उमेश परिचारक : कामगारांना 16.66 टक्के बोनस जाहीर

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

कचरेवाडी ( ता.मंगळवेढा ) येथील युटोपियन शुगर्सने ऊस उत्पादकांना २०० रु.ची दिवाळी हप्ता ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केला आहे. तसेच कामगारांनाही १६.६६% बोनस देण्याची घोषणा युटोपीयनचे चेअरमन उमेश परिचारक यांनी केली.

युटोपियन शुगर्स कारखान्याने या पूर्वीच ऊस उत्पादकांना दिवाळी दिवाळीसाठी गळीत हंगाम २०१९-२० या कालावधीत गाळप केलेल्या ऊसास प्रति मे. टन २०० रु. प्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली आहे. कामगारांचीही दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने कामगारांनाही १६.६६% बोनस म्हणून दिला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली.

यावेळी बोलताना परिचारक म्हणाले कि, युटोपियन शुगर्स ने गळीत हंगाम २०१९-२० मध्ये ४,०३,२३२ मे. टन इतक्या ऊसाचे गाळप करीत ३,९९,५००क्विं.इतकी साखर उत्पादित केली आहे. चालू वर्षी ऊस उत्पादकांकडे पुरेशा प्रमाणावर ऊस आहे. मात्र कारखाना प्रशासनावर विश्वास टाकून ज्या ऊस उत्पादकांनी २०१९-२० या गळीत हंगामामध्ये युटोपियन शुगर्स ला ऊस दिला आहे, त्या सर्व ऊस उत्पादकांना दिवाळी भेट देणार असल्याचे कारखाना प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले होते. त्यानुसार ऊस उत्पादकांना प्रति टन २०० प्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे.

दिवाळीच्या तोंडावर ही रक्कम मिळत असल्याने ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कारखान्याच्या वतीने कारखान्याच्या ऊस उत्पादकांना दिवाळीची साखर हि घरपोच देण्यात येणार आहे.कारखान्याच्या कामगारांना ही १६.६६% प्रमाणे बोनस देण्यात आला असल्याची माहिती ही चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली. या प्रसंगी कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख,अधिकारी वर्ग उपस्थित होता.

Leave a Reply

error: Content is protected !!