जिल्ह्यातील 10 साखर कारखान्याना नोटिसा
पंढरपूर : ईगल आय मीडिया
आम.समाधान अवताडे चेअरमन असलेल्या दामाजी सहकारी साखर कारखान्यासह राष्ट्रवादी चे युवक नेते भगिरथ भालके चेअरमन असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासही उसाची frp थकबाकी पोटी आर आर सी कारवाईची नोटीस काढली आहे. जिल्ह्यातील भाजप नेते आ.सुभाष देशमुख, धनंजय महाडिक चेअरमन असलेल्या साखर कारखान्यावर ही कारवाई होणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना उसाची एफआरपी न देणाऱ्या 24 साखर कारखान्याना आर आर सी कारवाई बाबत नोटिसा निघाल्या आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तब्बल दहा कारखान्यांना महसुली वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) नोटिसा पाठवण्यात येणार आहेत. आतापर्यंत १९ कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. या कारखान्यांकडून सुमारे ६५६ कोटी रुपये वसूल होतील, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.
‘आगामी वर्षात ऊस लागवडीचे क्षेत्रफळ आणखी वाढणार आहे. सुमारे १२ लाख हेक्टर क्षेत्रफळावर ऊस लागवड होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. द्राक्ष, अशी माहितीही गायकवाड यांनी यावेळी दिली. ‘या वर्षी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती केली असल्याने साखरेचा गाळप उतारा १०.५० टक्के आहे. इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या उसाच्या रसाची किंमत काढून त्याचा समावेश करण्यात येणार असल्याने साखरेचा सरासरी गाळप उतारा वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या एफआरपीमध्ये आणखी वाढ होईल,’ असा अंदाज शेखर गायकवाड यांनी वर्तवला आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सोलापूर
सिद्धनाथ शुगर लिमिटेड, उत्तर-सोलापूर
लोकमंगल शुगर लिमिटेड, दक्षिण सोलापूर
गोकुळ माऊली शुगर, अक्कलकोट
संत दामाजी कारखाना, मंगळवेढा
भीमा सहकारी साखर कारखाना, मोहोळ, सोलापूर
मकाई सहकारी साखर कारखाना, करमाळा, सोलापूर
लोकमंगल माऊली शुगर, सोलापूर
कंचेश्वर शुगर लिमिटेड, उस्मानाबाद
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, बीड
या साखर कारखान्यांना महसुली वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) नोटिसा येत्या सोमवारपर्यंत पाठवल्या जाणार आहेत, याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली आहे.