युनिट नं.2 चा 2 रा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न
करकम्ब : ईगल आय मीडिया
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.युनिट नं.2 करकंब या कारखान्याचा गाळप हंगाम 2020-21 चा 2 रा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ शुक्रवार ( दि.25 ) रोजी दुपारी 4 वाजता कारखान्याचे वाहन कंत्राटदार हरिश्चचंद्र सिताराम भिंगारे त्यांच्या सुविद्य पत्नी सुरेखाताई हरिश्चचंद्र भिंगारे ( रा.नांदोरे ) यांच्या शुभहस्ते व जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरूवात कै.विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. बॉयलर प्रदीपन समारंभानिमित्त सत्यनारायण महापुजा कारखान्याचे वाहन कंत्राटदार सत्यवान गेना करांडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुजाताताई सत्यवान करांडे रा.नांदोरे यांच्या शुभहस्ते पार पडली.
विठ्ठलराव शिंदे कारखान्याने युनिट नं.2 करकंब ऊस गाळप हंगाम 2020-21 गळीत हंगामामध्ये 5 लाख मे.टन गाळप करणेचे उद्दिष्ठ निश्चित ठेवलेले आहे. या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे 6 हजार 360 हेक्टर क्षेत्राची नोंद असून अंदाजे 6 लाख 50 हजार मे.टन ऊस गळीतास उपलब्ध होईल. कारखान्याने प्रतिदिन गाळप क्षमतेएवढा उसाचा पुरवठा होण्यासाठी 300 ट्रक्स/ट्रॅक्टर्स, 200 बैलगाडी व 150 ट्रॅक्टर टायरगाडीचे करार करण्यात आलेले आहेत. ऑफ सिझन मधील सर्व कामे पूर्ण झालेली असून गाळप हंगाम शासनाचे धोरणानुसार सुरू करणेस यंत्रणा सज्ज झालेली आहे.
संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट नं.2 करकंब येथे मागील हंगामामध्ये अल्पावधीत ऑफ सिझनमधील कामे पूर्ण करून 2019-20 या चाचणी गळीत हंगामामध्ये 1 लाख 46 हजार मे.टन ऊसाचे गाळप करून 1 लाख 55 हजार क्विंटल साखर पोती उत्पादीत केली होती.
सदर प्रसंगी जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे, कार्यकारी संचालक आर.एस. रणवरे, युनिट नं. 2 चे जनरल मॅनेजर एस.आर.यादव,चिफ इंजिनिअर एन.एच.नायकुडे, इनचार्ज चिफ केमिस्ट बी.जे.साळुंखे, वर्क्स मॅनेजर सी.एस.भोगाडे,चिफ केमिस्ट पी.एस. येलपले, डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही.बागल, शेतकी अधिकारी एस.एस.बंडगर व इतर मान्यवर उपस्थित होते.