विठ्ठल चा बॉयरल 8 ऑक्टोबर रोजी , कारखाना सुरू होणार

एक हंगाम बंद राहून , यंदा सुरू होत असल्याने परिवारात उत्साह

पंढरपूर : ईगल आय मीडिया

येत्या 8 ऑक्टोबर रोजी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर प्रदीपन समारंभ असून कारखाना यंदाच्या हंगामात सुरू होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा आहे. हा कारखाना चालू असला की तालुक्यातील अर्थकारण गतिमान असते. गेल्या वर्षी विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद होता, यंदा इतर कारखान्याचे बॉयलर पेटले तरी विठ्ठल कारखान्यावर सामसूम होती. त्यामुळे यंदाही कारखाना सुरू होतो की नाही याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. मात्र 8 ऑक्टोबर रोजी कारखान्याचा बॉयलर पेटत असल्याने विठ्ठल परिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदा तालुक्यात ऊसाचे अतिरिक्त उत्पादन होत असून विठ्ठल, सहकार शिरोमणी या कारखान्याच्या सभासदांमध्ये यामुळे अस्वस्थता पसरलेली होती. मागील वर्षी विठ्ठल, सहकार शिरोमणी, सीताराम हे कारखाने बंद राहिल्याने विठ्ठल परिवाराच्या सभासदांना ऊस गाळप करताना नाकी नऊ आले होते. यंदा तर ऊसाचे उत्पादन विक्रमी असल्याने आपल्या उसाचे काय असा प्रश्न सभासदांना पडला होता. पहिल्या दिवसापासून लोक विचारणा करीत होते की, यंदा तरी कारखाना सुरू होणार की नाही ? या पार्श्वभूमीवर कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामाचे नियोजन केले असून 8 ऑक्टोबर रोजी कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

गुरुवारी सकाळी 10 वाजून 10मिनिटांच्या मुहूर्तावर कारखाना स्थळावर बॉयलर प्रदीपदन करण्यात येत आहे. कारखान्याचे संचालक भगीरथ भालके, त्यांच्या सुविद्य पत्नी प्रणिता भगीरथ भालके यांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन होत आहे. यावेळी ह भ प किरण बोधले महाराज अध्यक्षस्थानी असणार आहेत. पंढरपूर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन संजय भिंगे यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. कारखाना सुरू होणार की बंद राहणार या शंका – कुशंका दूर झाल्या1 आहेत. त्यामुळे विठ्ठल परिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता सहकार शिरोमणी कधी सुरू होते याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!