कारखान्याचा 40 वा गाळप हंगाम बॉयलर प्रदीपन संपन्न
कारखान्याचे संचालक भगीरथ भालके यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले.
पंढरपूर : ईगल आय मीडिया
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम 2018-19 मधील 96 टक्के एफ आर पी दिलेली आहे, उर्वरित 177 रुपये प्रति टनथकीत frp, वाहतुकदारांची बिले, कामगारांची देणी गव्हाणीत मोळी टाकण्यापूर्वी म्हणजेच 15 ऑक्टोबरपर्यंत देण्यात येतील, अशी ग्वाही विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार यांनी दिली.
विठ्ठल च्या 40 व्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदिपण समारंभ गुरुवारी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी संपन्न झाला. कारखान्याचे संचालक भगीरथ भालके आणि त्यांच्या सौभाग्यवती प्राणिताताई भालके यांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन करण्यात आले. यावेळी मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष संजय भिंगे अध्यक्षस्थानी तर ह भ प किरण महाराज बोधले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना संचालक भगीरथ भालके म्हणाले की, यंदाच्या हंगामात कारखान्याकडे 13 लाख 25 हजार टन ऊस गाळपसाठी उपलब्ध आहे. यंदा पूर्ण क्षमतेने गाळप करण्याचे नियोजन झालेले आहे. शेतकरी, सभासदांनी आपला सर्व ऊस कारखान्यास गाळपास द्यावा.
यावेळी हभप किरण बोधले, दिनकर पाटील यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.