युटोपीयन च्या 7 व्या गाळप हंगामाची सांगता

5 लाख टन ऊस गाळप पूर्ण

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

कचरेवाडी ( ता.मंगळवेढा ) येथील युटोपियन शुगर्सच्या ७ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ आज ( सोमवार  दि.२२ रोजी ) चेअरमन उमेश परिचारक व सर्व खाते प्रमुख यांच्या शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. या चालू गळीत हंगामात युटोपीयन शुगर्स ने ५ लाख मे.टनाचे ऊस गाळप पूर्ण केले आहे. यावेळी वाहन ट्रॅक्टर पूजन कारखान्याने टेक्निकल जनरल मॅनेजर तुकाराम देवकते यांच्या हस्ते करण्यात आले .

        प्रास्ताविक कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी केले. प्रतिकूल अशा परिस्थितिमध्ये ही युटोपियन शुगर्स ने ५ लाख मे.टन ऊसाचे गाळप केले आहे, रिकव्हरी १० च्या आसपास राहिली. साखरेला उठाव नसल्याने साखर विक्रीवर व दरावर त्याचा परिणाम झाला आहे. साखरेचा किमान विक्री दर ३६ रु. करणे आवश्यक आहे अन्यथा आपल्या जिल्ह्यातील कारखानदारी मोडून पडेल. अशा कठीण काळात ऊस उत्पादक यांनी युटोपियन शुगर्सवर विश्वास टाकून सहकार्य केले बद्दल ऊस उत्पादक यांना, तसेच ऊस तोडणी कामगार, वाहन मालक, कारखान्याचे सर्व सप्लायर, व्यापारी, साखर व्यापारी, कारखान्याच्या प्रगती मध्ये ज्या-ज्या घटकांचा सहभाग आहे त्या सर्वांना मी धन्यवाद देतो.

     यावेळी परिचारक यांनी,  शासनाने इथेनॉलचे अतिशय उत्तम धोरण निश्चित केले त्याबद्दल केंद्र शासनाचे आभार मानले. जास्तीतजास्त ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार केले पाहिजे पण त्यासाठी आसवानी प्रकल्पात वाढ करण्यासाठी मोठया भांडवलाची गरज आहे, तरच शेतकऱ्यांना एफआरपी देणे शक्य होईल. कारखान्याने ४५ केएलपीडी आसवाणी प्रकल्पातून बी – हेव्ही मोलॅसेस पासून इथेनॉल ची निर्मिती करून शासनाकडे इथेनॉल पुरवठया साठी १ कोटी लिटर चे टेंडर ही भरले आहे त्यानुसार सध्या शासनाच्या तेल कंपनी यांना इथेनॉल पुरवठा चालू असल्याचे सांगितले.

सूत्रसंचालन व आभार सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे यांनी मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!