गुडी पाडव्यापासून श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार :  मंदिर समितीच्या शिष्टमंडळास उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही 


पंढरपूर : टीम ईगल आय


मागील 2 वर्षांपासून श्री विठ्ठल- रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन येत्या गुडी पाडव्यापासून पुन्हा सुरू होणार आहे. मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत मंदिर समितीच्या सदस्यासोबत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे.  बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  यासंदर्भात सकारात्मक  निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली आहे. त्यामुळे गुडी पाडव्यापासून श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन होणार आहे. 


कोरोना साथी मुळे 17 मार्च 2020 पासून श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद आहे. कोरोना साथ आटोक्यात आल्यानंतर ते दर्शन पुन्हा सुरू करावे अशी मागणी होत आहे. यासंदर्भात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत पदस्पर्श दर्शन सुरू करण्याची मागणी करणारा ठराव केला आहे. या ठरावासह या मागणीचा प्रस्ताव घेऊन मंदिर समिती सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे, सौ शकुंतला नाडगिरे, डॉ. दिनेश कदम, ऍड. माधवी निगडे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पूदलवाड आदी उपस्थित होते.


पाडव्यापासून भाविकांना चरणस्पर्श दर्शन  मिळणार
आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यांच्याकडे समितीच्या मागणीचा प्रस्ताव दिला. त्यावर उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत, बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  पदस्पर्श दर्शनासाठी निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे गुडी पाडव्यापासून भाविकांना चरण स्पर्श दर्शन मिळणार आहे. 

हभप गहिनीनाथ औसेकरसह अध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती


यावेळी अजित पवार यांच्याकडे  मंदिर समितीने पदस्पर्श दर्शन सुरू करण्याची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री  पवार यांनी सकारात्मक भूमिका घेऊन बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात निर्णय घेऊ अशी खात्री दिली. त्यामुळे गुडी पाडव्यापासून श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!