कमला एकादशी, श्रीविठ्ठल-रूक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची आरास

15 प्रकारची रंगीबेरंगी फुले : पुण्याचे भाविक राम जांभुळकर यांच्याकडून सेवा

पंढरपूर : ईगल आय मीडिया

अधिक महिन्यातील कमला एकादशी निमित्त श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात पंधरा प्रकारच्या रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी सुंदर अशी सजावट मंदिर समिती व पुण्याचे भाविक राम जांभुळकर यांच्या कडून करण्यात आली. मंदिराच्या गाभाऱ्यात येताच सावळ्या विठुराच्या दर्शनाने मन प्रसन्न होऊन जात होत. एकादशी निमित्त खास फुलांनी केलेली सजावट मनाला मोहित करणारी होती.

श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात सेवा करण्यासाठी पुण्याचे भाविक राम जांभुळकर यांनी मंदिर समितीकडे इच्छा व्यक्त केली होती. २५ कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने ही सजावट करण्यात आली. आरास करण्यात आलेल्या फुलांन मध्ये पाने व रंग ओचिड, ग्लॕडीओ, तगर, मोगरा, कामीनी, तुळशी, झेंडु, पांढरे, आस्टर, जरबेरा आणि शेवंती सात ते आठ प्रकारचे, गुलाब, निशीगंधा, कारनेशन अशी पंधरा प्रकारची फुले मागवण्यात आली होते.

करोना संसर्गजन्य महामारीमुळे श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेचे दर्शन मार्च महिन्यापासून बंद असले तरी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची नित्यपूज्या, एकादशी, सणानिमित्त फुला फळांची सजावट करण्यात येतच असते तीन वर्षातून येणाऱ्या अधिक महिन्यात श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते परंतु करोणामुळे मंदिर बंद असले तरी ऑनलाईन मुखदर्शन सुरू करण्यात आले आहे. मंदिरातील फुलांची आरास सजावटीचे काम मंदिरातील कर्मचारी यांनी केले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

One thought on “कमला एकादशी, श्रीविठ्ठल-रूक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची आरास

Leave a Reply

error: Content is protected !!