विठ्ठला, कोरोना मुक्त महाराष्ट्र कर !

संत कूर्मदासाचा वारस दंडवत घालत निघाला पंढरीला

पंढरपूर : ईगल आय मीडिया


जगाला कोरोना मुक्त कर, श्री विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुलं करावं, पायी वारीला परवानगी हवी, आदी समस्याचं साकडं घालण्यासाठी संत संत कूर्मदास महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लऊळ येथून वारकरी दाम्पत्य कूर्मदासाचा वारसा घेऊन दंडवत घालत निघाले आहे.

सोलापूर जिल्हयातील मोडनिंब येथील श्री विठ्ठल भक्त नागनाथ कोळी आणि त्यांची पत्नी जयश्री कोळी हे दांपत्य लऊळ येथून लोटांगण घालीत पंढरपूरकडे निघाले आहेत. कोळी हे शेतकरी कुटुंब आहे श्री विठ्ठल रखुमाईचे ते निस्सीम भक्त आहेत दरवर्षी वारीला न चुकता हजेरी लावणाऱ्या या दांपत्याला यंदा वारी भरणार नसल्याचे अतीव दुःख आहे.


लऊळ ते पंढरपूर हे 40 किलोमीटरचे अंतर दंडवत घालीत 5 दिवसांत पूर्ण करणार आहेत. काल दि. 15 जून रोजी त्यांनी प्रस्थान ठेवले आहे.
त्यांच्या संकल्पात भाविकांनी बाधा आणू नये कोणीही गर्दी करु नये शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन कोळी यांनी केले आहे.


हे दुःख व्यक्त करण्यासाठी आणि महाराष्ट्र कोरोना मुक्त व्हावा, पायी वारीला शासनाने अटी शर्थीवर परवानगी द्यावी असं साकडं घालण्यासाठी हे दांपत्य लऊळ या संत भूमीतून पंढरपूरकडे निघाले आहे लऊळ ही संत कूर्मदास महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे.

अपंग असलेले कूर्मदास पंढरीला वारीसाठी निघाले होते, त्यांना पुढं जाणं अशक्य झालं, तेव्हा थेट विठ्ठलाने लऊळ या भूमीत येऊन संत कूर्मदास यांना दर्शन दिले होते. अशी कथा सांगितली जाते.
कोळी दांपत्याने संत कूर्मदास महाराजांचे दर्शन घेऊन आपला संकल्प सोडला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!