टीम : ईगल आय मीडिया
देशभरात कोरोनाचा कहर कायम असून रुग्णसंख्येत जरी महाराष्ट्र देशात सर्वाधिक बाधित असला तरी मृत्यू दरानुसार गुजरातची परिस्थिती चिंताजनक आहे. पहिल्या दिवसापासून गुजरातचा मृत्युदर देशात सर्वाधिक असून तुलनेने रुग्णसंख्या अधिक असूनही महाराष्ट्रातील मृत्युदर गुजरातच्या तुलनेत जवळपास निम्मा आहे. देशाचा एकूण मृत्युदर २.९ टक्के इतका असून महाराष्ट्राचा सरासरी मृत्युदर 3.7टक्के इतका आहे. त्या तुलनेत गुजरातचा मृत्यू दर देशात सर्वाधिक 6.3 टक्के इतका असल्याचे दिसून आले आहे. त्या खालोखाल दिल्ली मध्ये ३. २ टक्के मृत्युदर आहे. आणि तामिळनाडू मध्ये केवळ १ टक्के कोरोना बाधित लोकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण आहे. देशातील कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू कमी होत नाहीत उलट जुलै मध्ये कोरोना बाधितांची संख्या ५. ५ लाखाहून अधिक असण्याची शक्यता आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे.
राज्य एकूण बाधित मृत्यू मृत्युदर
महाराष्ट्र 104568 3830 3.7
तमिळनाडु 42687 397 01
दिल्ली 38958 1271 3.2
गुजरात 23038 1448 6.3
लोकसंख्येच्या प्रमाणात मृत्यू
राज्य मृत्यू संख्या राज्यांची लोकसंख्या
महाराष्ट्र 3830 13 कोटी 29 लाख
दिल्ली 1271 2 कोटी 63
गुजरात 1448 7 कोटी 21
तमिळनाडु 397 8 कोटी 05
- ( आकडे १४ जून रोजीचे आहेत )