भाळवणी आरोग्य केंद्रात विक्रमी कोविड लशीकरण

टीम : ईगल आय मीडिया

भाळवणी (ता.पंढरपूर ) प्राथमिक आरोग्य केंद्रात काल ( दि.11 रोजी ) विक्रमी 5 हजार 474 हजार लोकांचे लशीकरण झाले आहे. याबद्दल संपूर्ण आरोग्य विभागाचे आभार मानले जात आहे. तसेच सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.

11 रोजी संपुर्ण जिल्ह्यातील लशीकरण करण्याचे प्रशासनाने ठरवले होते. त्याप्रमाणे येथील येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळपासून नागरिकांनी रांगा लावून लस घेतली. यावेळी या लशीकरण केंद्रास जिल्हा परिषद सदस्य शोभाताई वाघमोडे, पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे, सरपंच विठ्ठल चौगुले यांनी भेटी देऊन पाहणी केली. आणि आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित रेपाळ, सर्व कर्मचारी,आशा यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

विक्रमी कोविड लशीकरण केल्याबद्दल सत्कार

भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात काल 5474 विक्रमी लशी करण करण्यात आले. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून दिल्या बद्दल गावातील युवकांनी आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित रेपाळ व सर्व कर्मचारी यांचे कौतुक करून श्री फळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार केले . यावेळी संतोष पाटील, अर्जुन लिंगे, नवनाथ शिंदे, गोरख लिंगे, राजकुमार पाटील, आकाश म्हेत्रे, अतुल गवळी, बापू बुरांडे, निहाल शेख, उत्तम साठे, सागर गवळी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी शोभाताई वाघमोडे यांनी तेज न्यूज सांगितले की, प्रा.आरोग्य केद्रांचे वैद्यकीय अधिकारी व त्यांची टीम, गटातील सर्वच ग्रामपंचायतीने या मोहिमेसाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. असेच लसीकरण यापुढेही चालू राहील. असाच प्रतिसाद देऊन आपले आरोग्य व गाव कोरोणा मुक्त करूया, असेही वाघमोडे म्हणाल्या. तसेच कालच्या लसीकरणाचा उपयोग सर्वांना होण्यास्ठी युवकांनी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, सामाजिक, कार्यकर्ते, शिक्षक व ग्रामस्थ आदिनी सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!