कोरोनाचे नवीन रुग्ण 4 हजार 26

नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक

टीम : ईगल आय मीडिया

राज्यात गेले काही दिवस करोना मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे. मंगळवारी राज्यात करोनाने 4 हजार 26 रुग्ण आढळले तर ५३ रुग्ण दगावले आहेत. आतापर्यंत या आजाराने एकूण ४७ हजार ८२७ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. आज सर्वाधिक ७ मृत्यूंची नोंद मुंबई पालिका हद्दीत तर ६ मृत्यूंची नोंद पुणेपालिका हद्दीत झाली आहे. राज्यातील करोना मृत्यूदरआज २.५७ टक्के इतका असून तो आणखी खाली आणण्यासाठी आरोग्य यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत.

राज्यात काल ५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ४ हजार २६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ६ हजार ३६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या ९३.४२ टक्क्यांवर पोहचला असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७३ हजारपर्यंत खाली आली आहे.

मागील आठवड्यापासून राज्यात नवीन बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा अधिक आहे. गेल्या २४ तासांत ४ हजार २६ नवीन रुग्णांची भर पडली तर त्याचवेळी ६ हजार ३६५ रुग्ण करोनातून बरे होऊन आज घरी परतले. आतापर्यंत एकूण १७ लाख ३७ हजार ८० रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून आता ९३.४२ टक्के इतके झाले आहे.

करोना चाचण्यांचा आकडाही खूप मोठा आहे. आतापर्यंत एकूण १ कोटी १३ लाख ७७ हजार ७४ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून त्यातील १८ लाख ५९ हजार ३६७ चाचण्यांचे (१६.३४ टक्के) अहवाल करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४८ हजार ९६१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ५ हजार ६१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!