कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव : 40 दिवसानंतर सर्वाधिक रुग्ण

राज्य सरकार मोठा निर्णय घेणार ? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत

टीम : ईगल आय मीडिया

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज ( दि15 रोजी ) 40 दिवसानंतर सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्य सरकार मोठे निर्णय घेण्याचे संकेत मिळत आहेत.

राज्यात मागील दोन आठवड्यांत २० हजार २११ करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची ही वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे गरज भासल्यास पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. सध्या कुणीच मास्क वापरत नाही, असे दिसून येत आहे. ही बाब अत्यंत घातक आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, असा इशाराच अजित पवार यांनी दिला.

कोरोना पार्श्वभूमीवर कुणीही मास्क घालत नाही हे अत्यंत घातक आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी राज्यातील नागरिकांना दिलाय. औरंगाबादेत अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनावर कोणीही राजकारण करू नये, असंही अजित पवार म्हणालेत. रुग्ण वाढत असल्यानं कोरोनासंदर्भात कडक निर्बंध पुन्हा एकदा लागू करण्यात येण्याचे संकेत अजित पवार यांनी दिलेत. अजित पवार उद्या  मुख्यमंत्र्यांना भेटणार असून, या बैठकीत कोरोनासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

ग्रामस्थ आणि नागरिक मास्क वापरत नाहीत. उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असून, उद्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोरोनासंदर्भात कठोर निर्णय कदाचित घ्यावे लागतील, असा इशाराही अजित पवारांनी दिलाय. काही लोक कोरोनाबाबत नाहक राजकारण करत आहेत. शिवजयंती साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला, तर काही जणांनी शिवजयंतीला बंधन का आणता अशी टीका केली.

पण कोरोना वाढतोय, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. या विषयावर राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये, असंही अजित पवार म्हणालेत. कोरोना पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांना नियमावली लावली पाहिजे, मी मुंबईला गेल्यानंतर राज्य प्रमुखांशी बोलून तातडीने निर्णय घेऊ, असंही अजित पवारांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!