चिंताजनक : 24 तासात 6,112 करोनाबाधित रुग्ण

तर एका दिवसात 44 रुग्णांचा मृत्यू


टीम : ईगल आय मीडिया


राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे. मागील २४ तासांध्ये राज्यभरात ६ हजार ११२ नवे कोरोनाबाधित वाढले असुन, ४४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ८७ हजार ६३२ वर पोहचली आहे.

राज्यात पुन्हा एकदा करोना डोकं वर काढत असून अनेक ठिकाणी लॉकडाउन करण्यासंबंधी राज्य सरकार विचार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डिस्चार्ज मिळणाऱ्यांच्या तुलनेत करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असणं चिंतेची बाब असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी स्थानिक प्रशासनाला लॉकडाउनची मुभा देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.

याशिवाय मागील २४ तासांमध्ये राज्यात २ हजार १५९ जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. आजपर्यंत राज्यात १९ लाख ८९ हजार ९६३ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५. ३२ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात अॅक्टिव्ह केसेसची संख्या ४४ हजार ७६५ असुन, आजपर्यंत ५१ हजार ७१३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.४८ टक्के एवढा आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!