good news : राज्यात कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी २५. दिवस


मुंबई : ईगल आय मीडिया
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०. ४९ टक्के इतके असून रुग्ण दुप्पट होण्याचा वेग आता २५.९ दिवस एवढा झाला आहे. यावरून राज्यातील कोरोना वाढीच्या वेगावर नियंत्रण मिळवल्याचे दिसून येत आहे. ३१ मार्च रोजी रुग्ण प्रत्येक ३. दिवसांनी कोरोना बाधित रुग्णांची संख्या दुप्पट होत होती. मात्र १६ जून रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी तब्बल २५. दिवस एवढा झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे मानले जात आहे.
शुक्रवारी राज्याची संख्या १ लाख २० हजार ५०४ इतकी झाली आहे. यापैकी मुंबईत ६ हजार ८७५ रुग्ण आहेत. तर मुंबईत आत्तापर्यंत ३ हजार ३११ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रुग्णांचा डबलिंग रेट हा साप्ताहिक सरासरीनुसार कमी होतो आहे. यावरुनच कोविड १९ प्रसाराचा वेग मंदावत असल्याचं स्पष्ट होतं आहे. ९ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर मागील ३ महिन्यांच्या कालावधीत रुग्ण वाढीचा वेग क्रमशः कमी होतो आहे.

आरोग्य मंत्र्यांचे ट्विट !
महाराष्ट्रात ३७५२ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागच्या चोवीस तासांमधली ही संख्या आहे. तर २४ तासांमध्ये १०० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांमध्ये १६७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत ६० हजार ८३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्याच्या घडीला ५३ हजार ९०१ रुग्ण सक्रियआहेत. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन दिली आहे.

महाराष्ट्रात करोनाचा वेग मंदावला –
दिनांक- ३१ मार्च रुग्ण दुपटीचा कालावधी ३.५ दिवस
दिनांक ३० एप्रिल रुग्ण दुपटीचा कालावधी १०.२ दिवस
दिनांक ३१ मे रुग्ण दुपटीचा कालावधी २०.१ दिवस
१६ जून रुग्ण दुपटीचा कालावधी २५.९ दिवस
राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५०.४९ टक्के इतकं आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर ४.७७ टक्के इतका आहे. सध्याच्या घडीला राज्यात ५ लाख ८१ हजार ६५० लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर २६ हजार ७४० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात मागील २४ तासांमध्ये १०० मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत ६७, भिवंडीत २७, ठाण्यात ४, वसई विरारमध्ये १ तर नागपूरमध्ये १ अशी १०० मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. करोनामुळे महाराष्ट्रात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५ हजार ७५१ झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!