सोमवारी नवीन रुग्ण 11 हजार 921 तर बरे झाले 19 हजार 932
टीम ; ईगल आय मीडिया
राज्यात गेल्या 8 दिवसांपासून नवीन कोरोना बधितांची संख्या घटत असून त्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातील जनतेसाठी तसेच आरोग्य व्यवस्थेसाठी हे शुभ वर्तमान असल्याचे मानले जाते.
देशभरासह राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढत असला तरी, करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. सोमवारी दिवसभरात राज्यात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. सोमवारी राज्यात आज १९ हजार ९३२ जणांची करोनावर मात केली आहे. तर, ११ हजार ९२१ नवे करोनाबाधित आढळले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ७७.७१ टक्क्यांवर पोहचले आहे. तर, १८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १३ लाख ५१ हजार १५३ वर पोहचली आहे.
राज्यातील एकूण १३ लाख ५१ हजार १५३ करोनाबाधितांमध्ये २ लाख ६५ हजार ३३ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले १० लाख ४९ हजार ९४७ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ३५ हजार ७५१ जणांच्या संख्येचा समावेश आहे.
दरम्यान, देशात आजपर्यंत करोनातून बरे झालेल्यांच्या एकूण संख्येने ५० लाखांचा टप्पा ओलांडलेला आहे. मागील काही दिवसांमध्ये भारतात करोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एक दिवसात ९० हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.