सोलापूर जिल्ह्यासाठी दुसरी good news : 7 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

सोलापूर : ईगल आय मीडिया

कोरोना बाधीतांची संख्या शंभर पार झाल्याने चिंताग्रस्त झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आज शुक्रवारी दिलासादायक दोन बातम्या मिळाल्या आहेत. पंढरपूर चे सर्व 49 swab अहवाल निगेटिव्ह आले तर सोलापूर येथे उपचार घेत असलेल्या 7 कोरोनाग्रस्त रुग्णांना कोरोना मुक्त झाल्यानंतर घरी पाठवण्यात आले. त्यामुळे आता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 100 च्या खाली आली आहे. आज संध्याकाळी 1 महिला आणि 6 पुरुषांना कोरोनामुक्त झाल्याने मोठ्या उत्साहात घरी सोडण्यात आले. यावेळी त्या नागरिकांवर कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी केली. भावुक झालेल्या नागरिकांनी यावेळी डॉक्टरांनी केलेल्या सेवेबद्दल आभार व्यक्त केले.

गुरुवारी 3 नागरिकांना मुक्त केल्यानंतर आज 7 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान

पंढरपूरकरांना दिलासा : सर्व 49 अहवाल निगेटिव्ह

पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या त्या कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कातील सर्व 49 लोकांचे रिपोर्ट आज निगेटिव्ह आले आहेत.
शहरातील एका खाजगी रुग्णालयात मोहोळ तालुक्यातील महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. त्या महिलेस कोरोना पॉजीटीव्ह असल्याचे निदान झाले होतेे. त्या हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर ,नर्स , व दवाखान्यातिल इतर कर्मचारी अशा 49 जणांचे swab तपासणीसाठी घेतले होते. त्याचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!