टीम : ईगल आय मीडिया
राज्यात आज 63,729 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. राज्यात आजमितीस एकूण 6,38,034 एकूण रुग्ण सक्रिय असून, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 37,03,584 झालीय.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावाला आळा घालण्यासाठी ठाकरे सरकारकडून संचारबंदी लागू करण्यात आलीय. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच काही बंद करण्यात आलंय. विशेष म्हणजे तरीही राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होत नाहीये.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.12 एवढे झालेय. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2,33,08,878 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 37,03,584 (15.89 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत, तर सध्या राज्यात 35,14,181 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत, तर 25,168 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज 398 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. तर राज्यातील मृत्यू दर 1.61% एवढा झालाय. तसेच राज्यात आज 45,335 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण 30,04,391 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत.