देशात २४ तासात १७ हजार २९६ नवीन पॉजिटीव्ह
टीम : ईगल आय मीडिया
भारतात आणि एकूणच जगभरात कोरोनाचा कहर कायम असून आज भारतातील कोरोना ग्रस्त रुग्णची संख्या ५ लाख होण्याची शक्यता आहे. तर जगभरातील कोरोना बाधितांचा कडा ९७ लाखांवर गेल्याने लवकरच जगभरातील रुग्णांची संख्या हि १ कोटी होण्याची शक्यता आहे. दरम्यान मागील २४ तासात भारतात तब्बल १७ हजार २९६ पॉजिटीव्ह रुग्ण आढळले आहेत तर ४०७ रुग्णांचा मृत्यू २४ तासात झाला आहे.
भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४ लाख ९० हजार ४०१ इतकी झाली असून १५ हजार ३०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी २ लाख ८५ हजार ६३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर अजूनही १लाख ८९ हजार ४६३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
जगभरातील रुग्णसंख्या ९७ लाख १० हजार झाली असून ४ लाख ९१ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोना बाधित आणि मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. २५ लाख ४ हजार बाधित रुग्ण आहेत आणि १ लाख २६ हजार रुग्णांचा मृत्यू अमेरिकेत झाले आहेत.