टीम : ईगल आय मीडिया
महाराष्ट्रात कोरोनाचे दोन नवीन प्रकार आढळून आले आहेत. राज्यात E484Q आणि L452R हे दोन करोनाचे प्रकार आढळले आहेत. महाराष्ट्रातील १५ ते २० टक्के रुग्णांमध्ये करोनाचा हे नवीन प्रकार आढळले आहेत. राज्यातील १४ जिल्ह्यांमधून २०३२ नमुने घेतले गेले. यात ११ जिल्ह्यांमध्ये १२३ नमुने हे करोनाच्या नवीन प्रकाराचे आढळून आले. त्यामुळेच वाढत्या करोनाने चिंताही वाढवली आहे.
देशात करोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढत आहे. देशात आता एका दिवसाला ४७, २६२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या या वर्षातील सर्वात मोठी आहे. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील नमुन्यांच्या अभ्यासानंतर डिसेंबर २०२० च्या तुलनेत E484Q आणि L452R या करोनाच्या नवीन प्रकारांमध्ये काहीसा बदल झाल्याचं दिसून आलं आहे. या व्हायरसने संसर्ग अधिक वाढतो. करोनाच्या नवीन प्रकाराचे जवळपास १५ ते २० टक्के नमुने आढळून आले आहेत. हे नमुने आधीच्या कुठल्याही नमुन्याशी मेळ खात नाहीत.
N440K हा करोनाचा नवीन प्रकार १६ देशांमध्ये आढळून आला आहे. पण काही राज्यांमधील वाढत्या करोना रुग्णंसंख्येशी याचा थेट कुठलाही संबंध नाही. केरळमध्येही करोनाचा नवीन प्रकार आढळला आहे. केरळमध्ये करोनाचा N440K हा प्रकार आढळला आहे. केरळमधील करोनाच्या N440K या नवीन प्रकाराचे आंध प्रदेशात ३३ टक्के नमुने आढळून आले होते. तर करोनाच्या याच नवीन प्रकारचे ५३ टक्के नमुने हे तेलंगणमध्ये आढळून आले.
देशात सलग १४ व्या दिवशी करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशात सध्या ३,६८,४५७ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर गेल्या २४ तासांत २५७ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.