टीम : ईगल आय मीडिया
राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल १३ हजार ६५९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ९ हजार ९१३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आज ५४ मृत्यूंची नोंद झाली असून सक्रिय रुग्णांचा आकडा पुन्हा 1 लाखाच्या उंबरठ्यावर पोहचला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच राज्यातील करोना स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. सरकारची पुन्हा लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही मात्र नागरिकांनी करोनाचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत, असे विधान करत मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे सूचक इशाराच दिलेला आहे.
राज्यात आज गेल्या काही महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ पाहायला मिळाली आहे. २४ तासांत तब्बल १३ हजारांवर नवीन बाधितांची भर पडली आहे.