पुण्यात कोरोना पॉझिटिव महिलेने दिला जुळ्या मुलींना जन्म

आई आणि दोन्ही मुलींची प्रकृती खणखणीत

पुणे : ईगल आय मीडिया

पुणे येथील कोविड हॉस्पिटलमध्ये कोविड पॉझिटिव महिलेने 31 जुलै रोजी जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. पुण्याच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली असून जुळ्या मुलींचे फोटो शेअर करीत डॉक्टरांच्या पथकाचे आभार मानले आहेत.

पुण्यातील भवानी पेठ येथील पॉझिटिव्ह असलेल्या महिलेची 31 जुलै रोजी प्रसूती झाली. आणि या महिलेला जुळ्या मुली झाल्या आहेत. आई आणि नवजात बाळांची तब्येत चांगली आहे . त्यामुळे पुणे आरोग्य विभागाचे, हॉस्पिटलच्या डाक्टरांचे अभिनंदन होत आहे.

पुणे महानगरपालिकेच्यावतीने सोनवणे हॉस्पिटल कोविड हॉस्पिटलमध्ये चालवले जात आहे. या हॉस्पिटलमध्ये ही कोविड पॉझिटिव्ह महिला प्रसूत झाली आहे. पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ट्विट करीत, या सशक्त मुलींचे स्वागत आहे , डॉक्टर रोकडे, डॉक्टर चोपडे, डॉक्टर अग्रवाल, डॉक्टर आरती, डॉक्टर भोसले, आणि डॉक्टर सुजन या सर्व हॉस्पिटल पथकाचे आभार व्यक्त केले आहेत.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीसुद्धा या घटनेचे स्वागत करीत जुळ्या मुलींचा फोटो ट्विटरवर शेअर केला असून बाळ आणि बाळंतीण दोन्ही सुखरूप असल्याचे सांगितले आहे. पॉझिटिव्ह महिलेच्या यशस्वी यशस्वी प्रसूतीबद्दल डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!