सोलापूर जिल्ह्यातील 4 लाख ५२ हजार ७३९ बालकांना लसीकरण

मुख्य कार्यकारी अधिकारी मा.दिलीप स्वामी यांची माहिती

सोलापूर : ईगल आय मीडिया

जिल्ह्यात उद्या ( दि.३१ जानेवारी २०२१ ) रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरणाचा डोस दिला जाणार आहे.जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील ४ लाख ५२ हजार ७३९ बालकांना पोलिओ लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

दरम्यान, लसीकरणाचा जिल्हास्तरीय मोहीमेचे शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र, कोंडी ता.उत्तर सोलापूर येथे रविवार दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वा.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी सांगितले.तरी जिल्ह्यातील पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ केंद्रावर नेऊन लस पाजवून घ्यावी,असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी केले आहे.


याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी म्हणाले , जिल्हा प्रशासनाने पोलिओ लसीकरणाची जय्यत तयारी केली असून ७५३५ अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती एवढे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे.शहरी आणि ग्रामीण भागात ३२२७ पोलिओ लसीकरण केंद्रे असून प्रत्येक केंद्रावर लस उपलब्ध असणार आहे.

याशिवाय २१२ ट्रांझीट टीम आणि १३१ मोबाईल टीम कार्यरत राहणार आहेत.३१ जानेवारी रोजी पोलिओपासून वंचित राहिलेल्या बालकांना २ ते ४ फेब्रुवारी २०२१ असे तीन दिवस आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती घरोघरी, वाडीवस्ती, ऊसतोड टोळी, वीट भट्टी याठिकाणी भेटी देऊन लस दिली जाणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!