राज्यात विक्रमी कोरोना रुग्ण आढळले
टीम : ईगल आय मीडिया
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरू असून गेल्या वर्षभरातील एक दिवसात वाढीचा नवीन आकडा आज समोर आला आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल 30,535 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या 5 दिवसात फक्त महाराष्ट्रात सव्वा लाखापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे.
गेल्या 5 दिवसातील रुग्णसंख्या सव्वा लाख:-21 मार्च 30 हजार 535 रुग्ण, 2o मार्च – 27 हजार 126 रुग्ण, 19 मार्च – 25 हजार 681 रुग्ण, 18 मार्च – 25 हजार 833 रुग्ण, 17 मार्च – 23 हजार 179 रुग्ण
दरम्यान, राज्यात आतापर्यंत 22,14,867 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2 लाख 10 हजार 20 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या महत्त्वाच्या शहरांसह अनेक शहरांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे. विशेष म्हणजे हा कोरोना आता गाव-खेड्यातही वाढू लागला आहे.
पुण्यात आज दिवसभरात तब्बल 2900 रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत 3775 रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर नागपुरात 3614 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. राज्यात दिवसभरात तब्बल 99 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 53 हजार 399 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.