6 वर्षीय श्लोकला हवा मदतीचा हात

यकृत प्रत्यारोपण शस्ञक्रियेसाठी लागणार वीस लाख

पंढरपूर : प्रतिनिधी

भंडीशेगाव ( ता.पंढरपूर ) येथील ६ वर्षीय कु. श्लोक धनंजय सावंत याच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्ञक्रिया ज्युपिटर लाईफलाईन हाॕस्पीटल बाणेर, पुणे येथे होणार असून त्यासाठी सुमारे २० लाख रुपये खर्च होणार असल्याची माहिती डाॕक्टरांनी दिलीय.
धनंजय गणपत सावंत हे अल्पभुधारक शेतकरी असुन त्यांचा ऊदरनिर्वाह शेतीच्या ऊत्पन्नावर चालतो. त्यांना एक मुलगी आणि दोन मुले असून धाकट्या मुलास शेवटच्या टप्प्यातील यकृत रोगाचे निदान झाले आहे.

त्यासाठी श्लोकच्या काकी लक्ष्मी पांडुरंग सावंत यांच्या ९१५८५५७४८६ फोन पे किंवा गुगल पे वर आपली मदत पाठवावी , अॕक्सिस बँकेच्या बंडगार्डन शाखेत खाते असुन खाते क्रमांक- ९२२०१००२७६५२८७१ हा असुन आयएफसी कोड UTIB0000073 हा आहे.अधिक माहितीसाठी श्लोकचे चुलते पांडुरंग सावंत ७७१९९१९०५५ यांच्याशी संपर्क करावा.

आतापर्यंत त्यांनी मिञ व नातेवाईकांकडून ऊपचारासाठी ३ ते ४ लाख रुपये खर्च केला आहे. यकृत दाता म्हणून आई पुढे आली आहे , श्लोकच्या वडिलांचा रक्तगट मिळता जूळता असला तरी घरात वडील एकटेच कमावते असल्यामुळे आई यकृत दाता असणार आहे. या शस्ञक्रियेसाठी जवळपास २० लाख रुपये खर्च होणार असून इतकी मोठी रक्कम ऊभा करणे अशक्य असल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करावी असे आवाहन सावंत कुटुंबियांच्या हितचिंतक व्यक्तींनी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!