बुधवारी 59 हजार नवे कोरोना रुग्ण

तर 278 बाधितांचा मृत्यू

टीम : ईगल आय मीडिया

राज्यात आज नव्या करोना बाधित रुग्णवाढ चिंताजनकच आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५८ हजार ९५२ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. कालच्या तुलनेत आज किंचित घट झाली असून हा फरक १ हजार २६० इतका आहे. काल ही संख्या ६० हजार २१२ इतकी होती. याबरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३९ हजार ६२४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले.

आज राज्यात एकूण २७८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.६४ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ३९ हजार ६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २९ लाख ०५ हजार ७२१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.२१ टक्क्यांवर आले आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख १२ हजार २१३ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ८६ हजार ६३५ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ८४ हजार ०९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ६५ हजार ३६८ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४४ हजार ८८० इतकी आहे. या बरोबरच अहमदनगरमध्ये १७ हजार ९३७ इतकी आहे.

औरंगाबादमध्ये १४ हजार ६८०, तसेच नांदेडमध्ये ही संख्या १३ हजार ९१७ इतकी आहे. जळगावमध्ये १२ हजार १२६, तर रायगडमध्ये एकूण १० हजार ४१४ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ३ हजार ९८०, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ४५४ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ५८५ इतकी आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!